Ad will apear here
Next
लेखन कोणी वाचावे म्हणून नव्हे, तर स्वतःला व्यक्त करण्यासाठी करावे : सुधा मेनन


पुणे :
‘रोजच्या अनेक जबाबदाऱ्यांच्या धावपळीत आपण व्यक्त होत नाही. काही लिहायचे म्हटले, तरी आपण लिहू शकू का, येथपासून ते, जे लिहू त्याला कोणी वाचेल का, वाचले तर काय म्हणेल, अशा शंका काढत आपण लिहीतच नाही; पण लेखन स्वतःला व्यक्त करण्यासाठी करावे, कोणी वाचण्यासाठी नाही, हे ध्यानात ठेवले की लिहिणे सोपे होते,’ असे मत प्रसिद्ध लेखिका सुधा मेनन यांनी व्यक्त केले.

महिला दिनाचे औचित्य साधून ‘रायटिंग विथ वूमन’ (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू) या कथालेखन कार्यशाळेचे आयोजन मेनन यांनी केले होते. ही कार्यशाळा सात मार्चला बाणेर येथील ‘बिझ बे बाणेर’मधील मंचिंग रूट कॅफे येथे झाली. मेनन यांची ‘फाइस्टी अॅट फिफ्टी’, ‘लेगसी’, ‘देवी, दिवा ऑर शी डेव्हिल’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. या कार्यशाळेत समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील, पार्श्वभूमीच्या महिला सहभागी झाल्या होत्या. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना व्यक्त होण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या कार्यशाळेद्वारे करण्यात आला. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने स्वतःला लिहिते कसे करावे याचे कानमंत्र त्यांनी या वेळी दिले.

त्या म्हणाल्या, ‘महिला कामाला बाहेर पडून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत असल्या, तरी आजही त्यांना व्यक्त व्हायला मिळत नाही. महिलांकडे सांगण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे खूप काही असते. परंतु ते व्यक्त कसे करावे हेच त्यांना माहीत नसते. त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार न करता पेन हातात घ्यावे. जोवर पेन कागदाला लागत नाही, तोवर लेखन सुरू होऊ शकत नाही.’ 



आपले अनुभव, भावना, आठवणी कथांद्वारे मांडण्याचे एक तंत्र असते. ते तंत्र, त्यातील सहज सोप्या टिप्स या कार्यशाळेत सांगण्यात आल्या. ‘कथेला भाषेचे बंधन नसते, कथा हीच एक भाषा आहे,’ असे मेनन मानतात. त्यामुळे भाषेचे बंधन न बाळगता लेखनावर प्रेम करणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषा माध्यमांच्या महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

‘लेखन आपल्या आनंदासाठी असते. एकदा लिहायला सुरुवात झाली, की सुचायलाही लागते. सुचत नाही म्हणून लिहीत नाही असे म्हणत लेखन टाळू नये. स्वतःच्याच आयुष्यातील अनुभवांना विषय समजून लिहू लागले तर खूप गोष्टी सापडतील.’ असे त्या म्हणाल्या. 

‘जेव्हा एखादी स्त्री लिहिती होते, तेव्हा ती फक्त तिची गोष्ट सांगत नसते, तर त्या वेळचा समाज, समाजजीवन, आवडत्या-नावडत्या गोष्टी, त्यातून उलगडणारी पार्श्वभूमी, सामाजिक प्रगती आणि बरेच काही उलगडत जाते. एका बाईच्या लेखनातून तिच्या भोवतालची परिस्थिती समजू शकते,’ असे मेनन यांनी सांगितले. 

‘लेखन पंचेंद्रियांनी अनुभवता यायला हवे, लेखनातून वाचकाच्या डोळ्यासमोर एक चित्र रेखाटले जावे,’ असा कानमंत्रही त्यांनी या वेळी दिला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTMCK
Similar Posts
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
मी ‘पुलं’चा एकलव्य : अशोक सराफ पुणे : ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे.
संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी पाठपुरावा करणार पुणे : ख्यातनाम नाटककार, लेखक आणि शब्दप्रभू कवी राम गणेश गडकरी यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त २३ जानेवारी २०२० रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा बसवण्यात यावा, अशी
विश्वात कुणीही बेसूर नाही; सूर वैश्विक आहेत पुणे : ‘विश्वात कुणीही बेसूर नाही. आपल्या रोजच्या बोलण्यातही संगीत आहे. मनाची सुरांबरोबर अगदी उत्स्फूर्तपणे तार जोडली जाते. त्यामुळेच सूर वैश्विक आहेत,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक स्वामी कृपाकरानंद यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language